कार्याचा आढावा

मी डॉ. धनंजय जाधव आणि माझी पत्नी सौ. पूजताई जाधव, आम्ही दोघे नेहमीच समाजिक बांधिलकी जपून, सर्वांच्या सोबत घेऊन कार्य करत आलो आहोत. माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीचे जीवन सन्मानयुक्त, सुरक्षित आणि समृद्ध असावे, आणि यासाठी मी शिक्षण, आरोग्य, स्थानिक विकास, रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सतत प्रयत्न करत आहे.

सौ. पूजताई जाधव यांनी विशेषतः महिलांसाठी शिक्षण, सक्षमीकरण आणि आरोग्य यामध्ये महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना मदत पोहोचली आहे, समाजात सकारात्मक बदल घडले आहेत, आणि लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाली आहे.

आमच्या कार्याचा प्रत्येक निर्णय लोकांच्या हितासाठी घेतला जातो. आमचा कटिबद्ध संकल्प आहे – आपल्या सेवेत, आपल्या विश्वासासाठी आणि समाजाच्या प्रगतीसाठी सदैव काम करत राहणे. आम्ही आशा करतो की आमच्या प्रयत्नांमुळे धनोरी आणि आसपासच्या भागातील प्रत्येक नागरिकाचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि आनंदी होईल.

“जनतेसाठी समर्पित, विकासासाठी कटिबद्ध”

गरीब रुग्णांच्या डोळ्यांतली असहाय्यता पाहिली तेव्हा ठरवलं –

“आरोग्य ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे, ती कोणत्याही परिस्थितीत नाकारली जाऊ नये.”

मी असंख्य मोफत आरोग्य शिबिरं घेतली, स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या मांडल्या आणि बालकांच्या पोषणासाठी जनजागृती मोहिमा राबवल्या.आजही माझं ध्येय आहे की प्रत्येक नागरिकाला योग्य उपचार, योग्य सुविधा आणि आरोग्याचा हक्क मिळावा.

आरोग्य क्षेत्र

वंचित समाजातील एका मुलाच्या हातात पुस्तक दिसलं की माझ्या मनात प्रचंड आशा जागते. कारण ज्ञान हीच खरी ताकद आहे. माझ्या कार्यातून मी अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन दिलं आहे. खेळ आणि संस्कृती ही जीवन समृद्ध करणारी साधनं आहेत – म्हणूनच मी युवकांना केवळ अभ्यासापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केलं आहे.

शिक्षण व युवक विकास

समाजातील प्रत्येक दुर्लक्षित व्यक्तीची वेदना माझ्या हृदयाला भिडते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि न्याय मिळवून देणं हीच माझी खरी जबाबदारी आहे. महिलांना स्वावलंबी करण्यासाठी रोजगार प्रशिक्षण, युवकांना सक्षम बनवण्यासाठी कौशल्य विकास आणि पर्यावरणासाठी वृक्षारोपण – हे माझ्या प्रवासातील अविभाज्य टप्पे आहेत. मी नेहमीच विश्वास ठेवतो की समाजाचा बदल हा रस्त्यावरच्या संघर्षातून आणि एकजुटीतूनच घडतो.

सामाजिक उपक्रम

समाजसेवेचे काम करताना मला नागरिकांच्या डोळ्यांत अपेक्षा दिसल्या

“कोणी तरी आमचं ऐकावं, आमच्यासाठी उभं राहावं.”

झोपडपट्टी पुनर्वसन, पायाभूत सुविधा, पाणी, वीज, रस्ते – हे फक्त विकासाचे मुद्दे नाहीत, तर हजारो कुटुंबांचं स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी झटतोय आणि झटत राहीन. लोकशाही ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर लोकांशी सतत संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवणं हाच तिचा खरा आत्मा आहे. तो आत्मा जिवंत ठेवण्यासाठी माझं जीवन झटत राहील.

राजकीय कार्य

“विकास म्हणजे केवळ रस्ते वा इमारती नव्हेत; विकास म्हणजे सामान्य माणसाच्या आयुष्यातला सकारात्मक बदल.”